पहिलं सॉफ्टवेअर आहे- CCleaner.CCleaner मी आठवड्यातून दोनदा चालवतो. त्यामुळे माझ्या संगणकावर ज्या TMP किंवा Temporary Files तयार होतात त्या सुरक्षितपणे काढून टाकल्या जातात. जर ह्या tmp files साठत गेल्या तर डिस्कची जागा विनाकारण अडून संगणक स्लो होत असतो. Tmp files प्रमाणेच इंटरनेटसाठीच्या टेंपररी फाईल्स आणि आणखीही काही कचरा (काही जण त्याला Junk अपहिलं सॉफ्टवेअर आहे- CCleaner.CCleaner मी आठवड्यातून दोनदा चालवतो. त्यामुळे माझ्या संगणकावर ज्या TMP किंवा Temporary Files तयार होतात त्या सुरक्षितपणे काढून टाकल्या जातात. जर ह्या tmp files साठत गेल्या तर डिस्कची जागा विनाकारण अडून संगणक स्लो होत असतो. Tmp files प्रमाणेच इंटरनेटसाठीच्या टेंपररी फाईल्स आणि आणखीही काही कचरा (काही जण त्याला Junk असा चांगला शब्दही वापरतात) CCleaner साफ सा चांगला शब्दही वापरतात) CCleaner साफ
खालील लिंकवर क्लीक केलत तर तुमच्या साईटवर CCleaner चे डाऊनलोड सुरू होईल.http://download.piriform.com/ccsetup140.exeअधिक माहिती http://www.ccleaner.com वर मिळू शकेल.इंग्लंडमधील लोकप्रिय Web User ह्या मासिकाने CCleaner चे परिक्षण करताना म्हंटले होते - "one of those rare downloads that's so good you wonder how it can be free". वेब युजर मासिकाचा हा अभिप्राय पुरेसा बोलका आहे असं मला वाटतं. CCleaner आणखीही काही महत्वाची कामे करतो. आपला संगणक सुरू होताना जे प्रोग्राम्स आपोआप सुरू होतात (Start up) त्यातले आपल्याला काही नको असतील तर ते काढून टाकण्याची सोपी सुविधा तो Tools ह्या विभागात देतो. खालील आकृतीवरून ते लक्षात येईल.
दुसरे सॉफ्टवेअरदुसरे सॉफ्टवेअर आहे - Spybot-S&D म्हणजेच Spybot Search and Destroy. तुमच्या संगणकावर एखादे Spyware आहे का याचा शोध घेण्यासाठी तुमचा संगणक स्कॅन करण्याची कामगिरी Spybot-S&D करतो. स्कॅन केल्यानंतर जर त्याला Spyware, Adware, Malware, Trojan वगैरे असे चोर, दरोडेखोर सापडले तर त्यांचा बंदोबस्त करून त्यांना संगणकातून हद्दपार करण्याची पोलिसगिरी Spybot-S&D इमाने इतबारे करतो. सतत नवनवे Spyware, Trojan वगैरे येतच असतात. त्याकडे Spybot-S&D चे लक्ष असते. नव्या स्पायवेअरसाठी नवे उपचार Spybot-S&D तयार करीत असतो. त्यासाठी आपला Spybot-S&D प्रोग्राम आपल्याला सामान्यतः आठवड्यातून एकदा इंटरनेटवरून अपडेट करणं इष्ट असतं. Spybot-S&D उपलब्ध झाला २००२ साली. गेल्या चार-पाच वर्षात Spybot-S&D ने चांगले नाव मिळवले आहे. मी गेली अडीच वर्षे तो नियमित वापरतो आहे. त्यामुळे Spyware वगैरेंचा त्रास मला जवळजवळ होत नाही. मी Active Virus Shield आणि Spybot-S&D हे दोन्ही किमान दर आठवड्याला अपडेट करतो, आणि अपडेट केल्यानंतर न विसरता फुल स्कॅन करतो. यामुळे, व्हायरस आणि स्पायवेअर यांचेमुळे संगणक स्लो होण्याचा उपद्रव फारसा उद्भवत नाही. Spybot-S&D च्या बरोबर Ad Aware ह्या Spyware Cleaner प्रोग्रामचे नावही खूपच लोकप्रिय आहे. काही जण तो प्रोग्राम वापरतात. त्यांना तो Spybot-S&D पेक्षा अधिक आवडतो. मी मात्र Spybot-S&D ची शिफारस करीत असतो. Spybot-S&D डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
http://public.planetmirror.com/pub/spybot/spybotsd14.exe
इथे क्लीक करताच तुमचे डाऊनलोड सुरू होईल. त्याचा आकार (साईज) केवळ ४.८० एम.बी. आहे. नवीन वापरणारांसाठी त्याचे संपूर्ण टयुटोरियल खालील साईटवर उपलब्ध आहेआहे.
http://www.safer-networking.org/en/spybotsd/index.html.
देशभरचे पोस्टल पिन कोड शोधण्याची सोय आपल्या केंद्र सरकारने पोस्टाच्या वेब साईटवर केली आहे. त्यासाठीची ही लिंकःhttp://indiapost.gov.in/pinsearch1.aspवरील लिंकवर जाण्यापूर्वी एक महत्वाची सूचना - ही लिंक केवळ इंटरनेट एक्स्प्लोअरर वरच चालेल. फायरफॉक्स वा अन्य ब्राउझरवर ही लिंक चालत नाही.
मोल्सवर्थ यांची इंटरनेटवरील डिक्शनरी खालील लिंकवर उपलब्ध आहे.http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/मराठीत टाईप करून तुम्ही शब्दार्थ शोधू शकता. इलेक्ट्रॉनिक आवृत्ती असल्याने 'सर्च' ची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्या संगणकावर युनिकोड आधारित मराठी फॉंन्टस लावलेले असणं आवश्यक आहे. ह्या डिक्शनरीच्या इंटरनेटवरील पहिल्या पानाच्या एका भागाचे छायाचित्र खाली दिले आहे. इंटरनेटवरील मजकूर अतिशय सुस्पष्ट आणि सुवाच्च
Wednesday, June 6, 2007
Subscribe to:
Posts (Atom)