Thursday, May 31, 2007

Parental Filter ह्या नावाचं मोफत आणि माझ्या मते उत्तम असं सॉफ्टवेअर तुमच्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध आहे. http://www.ecommsec.com/pf/PfSetup30.exe ह्या लिंकवर क्लीक केलत की Parental Filter चा डाऊनलोड सुरू होईल. केवळ २.१ एम.बी. आकाराचं हे डाऊनलोड आहे. त्यामुळे ते पटकन डाऊनलोड होतं. डाऊनलोड पूर्ण झाल्यानंतर इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन नंतर तुमच्या पुढे खालील स्क्रीन येईल.त्यातील वरच्या बाजूस असलेल्या उजवीकडील लाल आयतावर (Banlist Off) वर क्लीक करा. म्हणजे तो चौकोन हिरवा होईल आणि Banlist On होईल. याचा अर्थ तुमचं Parental Filter चालू झालं. Pornography किंवा अश्लील प्रकारच्या वेबसाईटस उघडायचा प्रयत्न झाल्यास त्या उघडणार नाहीत. Page can not be displayed असा संदेश मिळेल.Parental Filter ने हजारो पोर्न व तत्सम साईटसची यादी केली आहे, आणि त्यांचा समावेश Banlist मध्ये केला आहे. दरमहा त्यात नवनव्या साईटसची भर पडत असते. त्यामुळे तुम्ही Banlist महिन्यातून एकदा जरूर अपडेट करा.आता, शेवटची पण सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्डची. तुम्ही लावलेलं Parental Filter कुणीही काढू नये यासाठी पासवर्डची व्यवस्था आहे. पासवर्ड लावण्यासाठी खाली दाखवलेल्या खुणेवर क्लीक करा.

आता समोर आलेल्या खालील विंडोमध्ये तुमचा पासवर्ड द्या.
हा प्रोग्राम बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. पण तो फार मोठ्या प्रमाणावर साईटस बॅन करतो अशी टीका काही जण करतात. ज्या अर्थी तो लोकप्रिय आहे, त्याअर्थी आपण टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे हेच बरे.२) रोजचे सुर्योदय व सुर्यास्त तसेच चंद्रोदयाच्या वेळा दैनिक वृत्तपत्रांसह कितीतरी साईटसवर वगैरे पहायला मिळतात. पण भविष्यकाळातील म्हणजे उदाहरणार्थ पुढल्या कुठल्या तरी महिन्यातील वेळा पहायच्या असतील तर इंटरनेटवर एखादी साईट आहे काय? - अविनाश नित्सुरे (पुणे)-पूर्वी ह्या वेळा सामान्यतः पंचांगांमध्ये पाहिल्या जायच्या. आता आपल्याला इंटरनेट सहज उपलब्ध झाले आहे व त्या मानाने पंचांग दुर्मिळ झाले आहे. यातून हा प्रश्न आला आहे. ह्या वेळा पाहण्यासाठी अनेक वेबसाईटस असल्या तरी मी www.timeanddate.com वरील http://timeanddate.com/worldclock/sunrise.html ही लिंक नेहमी वापरतो. भारतातील अनेक महत्वाच्या शहरांतील सुर्योदय, सुर्यास्त, चंद्रोदय व चंद्रास्ताच्या वेळा इथे पहायला मिळतात. महाराष्ट्रातील मुंबई व पुणे, ह्या शहरांचे हे तपशील इथे उपलब्ध करण्यांत आले आहेत. त्यात जानेवारी १९८८ ते डिसेंबर २००८ ह्या काळातील (सुमारे २० वर्षे) कोणत्याही दिवशीचे सुर्योदय, सुर्यास्त, चंद्रोदय व चंद्रास्ताच्या वेळा आपल्याला मोफत पहायला मिळतात. आपल्याला साधे रजिस्ट्रेशन देखील करायला सांगितले जात नाही हा भाग महत्वाचा आहे. इतर साईटसवर जेथे हा तपशील मिळू शकतो तेथे हमखास आपल्याला रजिस्ट्रेशनची कटकट सहन करावी लागते.३) भारतातली शहरे व विविध ठिकाणांचे अक्षांश आणि रेखांश कुठे मिळू शकतील? मला मिरज शहराचे अक्षांश व रेखांश हवे आहेत. - उदय मिरजकर (बोरिवली, मुंबई) - ह्या साठी http://www.indiapress.org/horoscope/ ह्या साईटवर जा. ह्या पानावर तळाशी पहा खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे A to Z पर्यंत लिंक्स आहेत. तुम्हाला मिरज शहराचे अक्षांश रेखांश हवे आहेत. ते M अद्याक्षरावर क्लीक केल्यानंतर मिळतील. तसेच तुमच्या बोरिवलीचे अक्षांश रेखांश अर्थातच B वर क्लीक केल्यावर उपलब्ध होतील.भारताबाहेरील स्थळांचे अक्षांश रेखांश दाखविणार्‍या वेबसाईटस तर फारच मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याची माहिती http://jan.ucc.nau.edu/~cvm/latlon_find_location.html ह्या लिंकवर मिळू शकेल.

No comments: