Saturday, May 26, 2007

रजिस्ट्रेशनला कंटाळणारी मंडळी ह्या www.bugmenot.com वर जातात. तिथून तयार मिळणारा लॉगिन नेम आणि पासवर्ड उचलतात. तो वापरतात आणि त्या साईटमध्ये (रजिस्ट्रेशन न करताही) मुक्त संचार करतात.

करावं लागतं बघा.
आणखी एक युक्ती
http://www.gishpuppy.comही साईट डिस्पोजेबल वेब ईमेल पत्ता तुम्हाला अधिकृतपणे देते. ह्या साईटवर जायचं. रजिस्टर करायचं. ईमेल अड्रेस - उदाहरणार्थ abcd@gishpuppy.com असा काहीतरी घ्यायचा. यातलं वैशिष्ट्य म्हणजे ह्या पत्त्यावर तुम्हाला ज्या ज्या ईमेल येतील त्या आपोआप तुमच्या सध्याच्या ईमेलवर पाठवल्या जातील. म्हणजे तुमचा नेहमीचा ईमेल पत्ता गुप्त राहतो आणि अर्थातच त्यामुळे स्पॅमचा धोका रहात नाही. पण समजा तुमचा हा नवा gishpuppy चा ईमेल स्पॅमला सापडला, आणि त्यावर कचरा ईमेल येऊ लागल्या तर? तो कचराही तुमच्या त्या गुप्त ईमेलवर येऊन नाही का पडणार? असे प्रश्न तुम्ही नक्कीच विचारणार. असं जर होऊ लागलं तर तुम्ही तो gishpuppy चा पत्ताच निकालात काढून टाकायचा. त्याजागी मग दुसरा घ्यायचा. gishpuppy च्या ईमेलची युक्ती बर्‍याच जणांना आवडते. त्याचं आणखी एक कारण म्हणजे Firefox आणि Internet Explorer साठी एक प्लगिन gishpuppy देतो. हा प्लगिन लावला की तुमच्या ब्राऊजरवर असताना तुमच्या माऊसच्या राईट क्लीकला Gish it नावाची एक कमांड मिळते. ज्या साईटवर रजिस्ट्रेशन करायचं असेल त्या पानावर Gish it क्लीक करायचं. म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथे एक नवा gishpuppy ईमेल पत्ता दिला जातो. तो तुम्ही फक्त त्या रजिस्ट्रेशनसाठी वापरायचा. काम झालं की बाद करायचा. Gishpuppy आणि bugmenot यांच्यात फरक इतकाच की Gishpuppy ची सेवा जगभर रितसर मान्यताप्राप्त आहे, तर bugmenot ला मात्र अजून नीतीवाद्यांची रितसर मान्यता अजून मिळालेली नाही. अर्थात, मान्यतेची वाट पहात बसणारं आजचं जग नाही. त्यामुळेच Gishpuppy काय किंवा bugmenot काय, दोन्हीही सारखीच, किंबहुना bugmenot काकणभर जरा जास्तच लोकप्रिय आहे.

No comments: